चुकून पैसे दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर झाल्यास हे करा ; मिळवा सगळी रक्कम परत..


सध्या ऑनलाईन व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे, पण अजूनही बऱ्याच जणांना व्यवहार करताना अडचणी येतात
त्यातून बरंच चुका होतात आणि त्याचा तोटा पुढे नागरिकांनाच सोसावा लागतो.
मोबाईल बँकिंग करताना काही वेळा चुकून भलत्याच बँक अकाउंट वर पैसे ट्रान्सफर केले जातात. काहीवेळा ऑनलाइन फसवणूकही केली जाते. आपण हे पैसे परत मिळू शकतो , चला तर नेमकी पद्धत जाणून घेऊया.

बँकेला ताबडतोब कळवा
चुकीने दुसऱ्याच्या बँक अकाउंट वर पैसे पाठवण्यात आल्यास बँकेच्या कस्टमर केअर शी संपर्क साधा व त्यांना याबाबतची सर्व माहिती द्या, बँकेने इ मेल करायला सांगितल्यास व्यवहाराची तारीख , वेळ, तुमचा   अकाऊंट नंबर, ज्या अकाऊंट वर पैसे पाठवले आहे त्याची सर्व माहिती नमूद करा.

चुकीचा अकाऊंट नंबर टाकल्यास
चुकीचा अकाउंट नंबर किंवा आय एफ एस सी कोड टाकला गेला असल्यास पैसे आपोआप परत तुमच्या खात्यात जमा होतील मात्र पैसे परत न मिळाल्यास बँकेत जाऊन मॅनेजरला सर्व माहिती द्या. कोणत्या अकाऊंट वर गेले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा चुकीचा व्यवहार तुमच्या स्वतःच्या अकाऊंट वर झाला असेल तर ते पैसे सहज तुमच्या खात्यावर मिळतील.

दुसऱ्याच्या अकाऊंट वर पैसे गेल्यास
चुकून पैसे दुसऱ्याच्या अकाउंट वर जमा झाल्यास ते पैसे मिळवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. बँकांना कधीकधी असे प्रकरण सोडवण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक वेळ लागतो. तुमच्याकडून कोणत्या बँकेत , कोणत्या शाखेत , कोणाच्या खात्यावर ही रक्कम गेली आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते. ही माहिती मिळाल्यावर त्या शाखेशी संपर्क साधून ही रक्कम परत मिळवण्याचा प्रयत्न करा. ज्या व्यक्तीच्या अकाउंट वर ही रक्कम जमा झालेली आहे त्याला कळवून बँक रक्कम परत करण्याची परवानगी मागेल. त्या व्यक्तीने परवानगी दिल्यावर बँक ती रक्कम तुम्हाला परत करेल.

समोरचा व्यक्ती पैसे देत नसल्यास
बऱ्याच वेळा असं होतं की पुढचा व्यक्ती पैसे देण्यास नकार करतो , त्याच्यासाठी एक कायदेशीर मार्गही आहे.
त्या व्यक्तीबद्दल तुम्ही पोलिसांकडे तक्रार करू शकता. त्याच्याविरोधात न्यायालयात खटलाही दाखल करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Translate

نموذج الاتصال

Youtube Channel Image
Mahitiwala - माहितीवाला गरज नसावी पण माहिती असावी
Subscribe